Vatevarlya Savlya - Marathi


Price: ₹99.00
(as of Jul 26,2022 02:22:35 UTC – Details)


या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातु.श्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करुन करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात. गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्य्र व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रुपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.
From the Publisher

Vatevarlya Savlya by G. D. Madgulkar

Vatevarlya SavlyaVatevarlya Savlya

Book Review

‘‘गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न. या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. ‘गदिमा’ हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि ओठाओठावर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली, असा हा महान साहित्यिक होता.

या पुस्तकातील प्रवासात गदिमांना अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यातील पुष्कळांचा त्यांना फार घनिष्ठ सहवास घडला. काही विचित्र वा कटू अशा प्रकारचे अनुभवही आले; पण प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यातच बरेचसे पूर्वायुष्य खर्ची पडले असल्यामुळे की काय, कुणाविषयीही त्यांच्या मनात कधी अढी राहिली नाही की कटुता राहिली नाही. कलेच्या ध्यासाने ते आपला मार्ग शोधीत राहिले — चालत राहिले. काही व्यक्तींविषयी त्यांना उत्कटपणे वाटणारा कृतज्ञताभावही या वाटचालीतून दृग्गोचर होत राहतो. मराठी रसिकांनी गदिमांच्या साहित्याला आणि चित्र-कला-कृतींना आजवर भरघोस दाद दिली आहे. या रसिकांना ही नवी ‘सावल्या’तली वाटचाल सुखद ठरेल, याबद्दल संदेह नाही.’’

– आनंद अंतरकर

चित्रपटसृष्टीतील कै. माडगूळकरांच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास लक्षात घेतला तर एका कलावंताची तरुण आयुष्यातली एक अंधारयात्रा संपली आणि पुढच्या उजेडाच्या प्रवासापर्यंत तो कसा येऊन ठेपला, हे सांगणारी ही आत्मकथा ठरू शकते.

ध्येय नाही, ध्येयाची कल्पनादेखील नाही. सामान्य माणूस केवळ जीवनाचा रस्ता चालत असतो. मरणाने त्याची वाटचाल थांबते की नाही कोण जाणे. कदाचित ती वाटचाल अनंत जन्मांचीही असू शकेल.

जगणे म्हणजे एक अनंत मार्ग चालत राहणे. प्रत्येकाचे जीवन वेगळे असते. प्रत्येकाची वाट वेगळी असते. महानुभाव वाङ्मयातील ‘हत्ती आणि आंधळे’ या कथेतील आंधळ्यांप्रमाणे प्रत्येकाला आयुष्याचे दर्शन वेगळे घडते. केवळ रंजकतेचाच निकष लावला, तर सर्वांचीच आयुष्ये वाचनीय ठरतील.

———————————————————————————–

या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातुःश्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि. स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.

गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उभे होते. असीम दारिद्र्य व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस कृतज्ञ आहे. मराठी मनावर स्वत:ची एवढी दृढ-सखोल छाप ठेवणारा कलावंत विरळाच म्हणावा लागेल. आपल्या रूपाने गदिमांनी साहित्य-चित्रसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले.

G. D. MadgulkarG. D. Madgulkar

G. D. Madgulkar

गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी त्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता–जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), ‘अजून गदिमा’ आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१)

ASIN ‏ : ‎ B07Z3C1SPS
Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Second edition (1 January 2019)
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 180 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9352202058
ISBN-13 ‏ : ‎ 978-9352202058
Item Weight ‏ : ‎ 170 g
Dimensions ‏ : ‎ 14 x 14 x 21 cm
Country of Origin ‏ : ‎ India

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.